सोमवार, 3 मई 2010

मी कंत्राटी

मी कंत्राटी 
     हल्ली खुप अवघडल्या सारख वाटते, जेव्हा कोणी विचारतो तुम्ही काय करता. जल्स्वराज्य प्रकल्पात तज्ञ म्हटल्यावर, समोरचा त्वरित सहानुभूति दाखवत म्हणतो, कंत्राटी न ..पेपरात वाचल होत, तुमचा प्रोजेक्ट तर बंद होणार आहे. अजुन किती दिवस आहे. जणू काही कुठला वर्ण भेद्च. कंत्राटी म्हणजे एक जातच. परमानेंट म्हणजे उच्च वर्णीय आणि कंत्राटी म्हणजे निम्न. हे जणू जग मान्य समीकरणच.
   ऐकायला खुप जोरदार वाटते.. माहिती शिक्षण संवाद तज्ञ, ते ही जिल्हा स्तरीय.सहाव्या वेतन आयोगात चपराशी चा पगार ही जास्त आहे माझ्या पेक्षा. तिन वर्ष झाले आपल्या घरापासून दूर मी इथे लोकांसाठी काम करतो.  परिवार जवळ राहू शकत नाही कारण नोकरी इथे आहे. आणि परिवाराला इथे आणु शकत नाही कारण ते नागपुरात परवडत नाही. कंत्राटी असे पर्यंत लग्नाचा विचार ही   मुर्खपणाच. तसे ही शासनने मला नोकरीवर ठेवले आहे, माझ्या परिवराशी किंवा खाजगी समस्येशी शासनच  काही देणे घेणे नाही. शासन दारू विकणारया कंपन्यांचे क्रिकेट टीम चे कोट्यवधी चे टैक्स माफ़ करू शकतो. पण अक्ख्या महाराष्ट्राची तहान भागाविन्यासाठी झटणाऱ्या तज्ञान्चे विचार करू शकत नाही. कारण  आम्ही कधी संप ही करत नाही.आणि टीवी वर लोकांचा मनोरंजन ही करत नाही. 
मजुरांचा शोषण करणार्या ठेकेदारत आणि शासनात फ़क्त एवढाच फरक आहे, त्याला शिक्षा होऊ शकते पण शासनाला नाही.
सहा वर्षात आमच्या जोरावर शासनाच्या प्रक्ल्पने 'पीपल फर्स्ट ' पुरस्कार मिलवला खरा, मात्र दुपटी टिपती ने वाढणाऱ्या महगाई सोबत एक रुपया पगार वाढ दिली नाही.
लोकांचे आरोग्यदायी जीवन आम्ही सुनिश्चित केले खरे, मात्र प्रकल्पाच्या कामात कुठली दुर्घटना झाल्यास त्याचा औषधोपचार  खर्च ही शासनला मान्य नाही.
दिवस रात्र एक करून प्रसंगी सुट्यान्च्या दिवशी ही आम्ही काम केले, मात्र आजारी पडल्या वर एखाद्या रोजनदारी मजूर सारखी पगार कपात केलि शासनाने.
आमच्या कडून अपेक्षा अश्या कामाची जो किमान १५ वर्ष टिकेल आणि आम्हाला नोकरी मिळते दोन आणि तिन महिन्यांच्या तुकड्यात. 
जागतिक बँकेच्या प्रकल्पाच्या नावाखाली शासनाने आम्हाला असी फाइल सिस्टम शिकवली, ज्याची बाहेर च्या व्यावसायिक जगतात कवडी ची कीमत नाही.
आम्ही ध्येय वेडे इथे काही तरी बदल घडवायला आलो होतो. हा आमचा 'प्रोफेशन' नाही तर 'पैशन' आहे . आम्ही भित्रे नाहित की अर्ध्या वाटेतुन  पळ काढू.  आम्ही भिकारी पण नाही की शासन दरबारी रडगाणे गात  राहू. आमच्या योग्य्ते च्या आधार वर आम्ही इथे आलो होतो. अजुन पुढे जाऊ. नुकसान आमचा की शासन चा हे येणारा काळ सांगेल.
       सामाजिक पैलू कड़े दुर्लक्ष केल्यामुलेच आज पर्यंत शासकीय योजनेंची दुरावस्था  होत आली आहे.  शासन ला जर असे वाटते कि सामाजिक बदल काही जादू ची काडी फिरविल्या सारखे येतात तर त्यांना शुभेच्छा. माझ्या सारख्या एका सामान्य कंत्राटी माणसाचे शासनाला आव्हान आहे कि त्यानी सामाजिक तज्ञांच्या च्या नियमित जागा निर्माण केल्या शिवाय या वैफल्याच्या दुष्टचक्रातुन मुक्त होउन दाखवावे. 
शिवरायाना चांगली माणस मिलाली म्हणून हिन्दवी स्वराज्यचे स्वप्न साकार झाले. चांगली माणसे गमावून जलस्वराज्य चे स्वप्न साकार करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासनाला देव सद्बुद्धि देवो. 


प्रभाकर मिश्रा
   

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें